सरदवाडी येथे अशोक पवार यांच्या गाव भेट दौऱ्यात गावकऱ्यांचा मोठा सहभाग!
मी आता कोणत्याच राजकीय पक्षात नाही,अशोक पवार हेच माझा पक्ष!मा. लोकनियुक्त सरपंच विलास कर्डिले
सरदवाडी : सुदर्शन दरेकर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शिरूर हवेली चे अधिकृत उमेदवार अशोक बापू पवार यांच्या प्रचारा निमित्त पुणे नगर हवे वरील भेळ आणि मिसळ साठी प्रसिद्ध असलेल्या शरदवाडी गावात गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिलांचा सहभाग होता.
विलास कर्डिले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की अशोक पवार यांनी गावच्या विकासासाठी भरीव योगदान दिले असून गावाने त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून द्यावे व आपली राहिलेली पुढील कामे मार्गी लावावीत, स्वर्गीय रसिक लाल धारिवाल व माझे जुने ऋणानुबंध होते. मार्ग दाखवून दिला आमदार अशोक पवार यांनी मला वेळोवेळी सहकार्य केले मधल्या काळात माझ्याकडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा जो मोह झाला त्याबद्दल मी बापूंची दिलगिरी व्यक्त करतो आपल्याबरोबर राहील अशी ग्वाही देतो.
यावेळी माजी उपसरपंच कृष्णा घावटे,उद्योजक दत्तात्रय कुंडलिक,मगर सर सर्व ग्रामपंचायत सदस्य व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
